05:06pm | Jul 06, 2020 |
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या पदाधिकार्यांसह, विभाग प्रमुख असलेल्या अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत आज सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या विविध कामांच्या सदयस्थितीचा आढावा घेवून, अधिकार्यांनी जनसामान्यांना केंद्रबिंदू मानुन काम करावे, गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत असताना, विकास कामांच्या पाठपुराव्यास जरी मर्यादा आल्या असल्या तरी सुध्दा येणार्या काळात समयबध्द नियोजन करुन, लोकहिताची कामे मार्गी लागण्याबाबत, सर्व अधिकार्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी असा मार्गदर्शनात्मक सल्ला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला. तसेच यावेळी महत्वाच्या विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करण्याचा निर्णय घेवून संबंधीतांबरोबर युनियन क्लब, यादोगोपाळ पेठ बगिचा, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होणार्या आर्ट गॅलरी, सदाशिवपेठ भाजी मंडई, करंजे येथील होणारी पाण्याची टाकी आणि नवीन शाळा, माजगांवकरमाळ घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, करिअप्पा चौक विकास, नवीन प्रशासकीय इमारत, कर्मवीर हौसिंग सोसा.मेडिटेशन हॉल, इत्यादी ठिकाणच्या कामांची जागेवर जावून पाहणी केली.
युनीयन क्लबचे पाठमागील बाजुस नगरपरिषदेची 57 गुंढे मोकळी जागा आहे, सदर जागेचा चांगला विनियोग करताना, युनियन क्लबशी बोलणी करुन, चांगले नियोजन करता येईल, या मोकळया जागेच्या उपयोगाबरोबरच युनियन क्लबची जुनी इमारतही नव्याने बांधुन चांगली वास्तु याठिकाणी निर्माण करता येईल असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
यादोगोपाळपेठ येथील कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज गार्डनच्या ओढयाला रिटेनिंग वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. येथ्।ील जागेचा उंचसखल-चढउताराचा फायदा घेवून, लॅन्डस्केपिंगचे डिझााईन तयार करण्यात आलेले आहे, हे गार्डन अस्तित्वात आल्यावर एक देखण्या गार्डनचा लाभ, सातारकरांना घेता येईल. याकामाचे टक्नीकल सॅक्शनची रक्कम तातडीने आजच प्रदान करा अश्या सूचनाही यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केल्या.
नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरीचा डिझाईनची पहाणी केली. याठिकाणी मुख्य इमारतीच्या वर दुसरा मजला वाढवून सुंदर अशी आर्ट गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. जुन्या इमारतीचा सुमारे 20 फुटांचा पुढील भाग रोड वायडींगमध्ये जाणार असल्याने, येथील कॉर्नरचा रस्ताही चांगला रुंद होणार आहे आणि नागरीकांना विविध प्रदर्शनासाठी एक चांगली उपयोगी वास्तु अस्तित्वात येईल असे मतप्रदर्शन यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यानी केले
नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेची आज मोजणी, मोजणी खात्याकडून सुरु करण्यात आली त्या कामाचीही पहाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
तसेच जनरल करिअप्पा चौक येथील पडलेली भिंतीची पहाणी, माजगांवकरमाळ येथील घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, कर्मवीर हौसिंग सोसायटी येथील मेडिटेशन हॉल, सदाशिवपेठ मटण मार्केट, कमानी हौद जतन, सुशोभिकरण व विकास, आदी विकास कामाबाबत प्रत्यक्ष जागेवर पहाणी करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कामे जलदगतीने होणेबाबत उपस्थितांना सूचना केल्या. या सर्व कामांमध्ये, आवश्यकता भासेल तेथे आम्ही उभे राहु परंतु कामे ही झाली पाहिजेत अश्या सूचना यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी व अधिकार्यांना दिल्या.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |