03:43pm | Sep 29, 2020 |
सातारा: सातारा शहर परिसरात चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी दोन संशयित येणार्या असल्याची बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सहा चोरीच्या दुचाकी असा एकूण 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. सातारा शहर पोलीस ठाणे हदीतील सातारा एस.टी.स्टॅन्ड परिसर तसेच इतर पोलीस ठाणे हदीत अज्ञात चोरटे मोटरसायकल चोरी करीत होते. सदर चोर्या उपड करून आरोपीनां अटक करणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सातारा याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यानी सदर मोटारसायकल चोर्या उघड करण्याकरीता पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड व स्थानिक गुन्हे शाखे कडील स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाला पेट्रोलींग करित असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेले दोन चोरटे जेरबंद करण्यात आले. सदर चोरट्यांमधील मुख्य आरोपीने सालारा एस.टी.स्टॅन्ड पर्किंग, उंब्रज, काशीळ येथुन एकुण 6 मोटरसायकल चोरल्याची कबुली देवून त्या सर्व मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहोत. सातारा शहर गु.र.नं.748/2020 2) सातारा शहर गु.र.नं.746/2020 3) सातारा शहरगु.र.नं.7730/2020 असे गुन्हे दाखल असुन उंब्रज,योरगाव हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटरसायकल मालक यांनी फिर्यांद दाखल केली नसल्याने त्यांना संपर्क करून संबधित पोलीस ठाणेस तक्रार दाखल करणेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, पोहवा सुधीर बनकर, संतोष पवार, मुबीन मुलाणी, पो.ना.शरद वेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विशाल पवार व चालक विजय सावंत यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |