08:41pm | Apr 12, 2021 |
सातारा : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मागणी करूनही आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही, अशी तक्रार जिल्ह्यातुन होत असताना वडूज ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दिलासा देण्यासाठी तातडीने रिक्षातच उपचार करण्यात आल्याची माहिती वडूज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांनी दिली. दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व सूरज लोहार यांच्या पाठपुराव्याने कोविड सेंटर उभारणीच्या कामाला गती मिळत असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खटाव येथे सुज्ज कोव्हिड सेंटरची उभारणी केली होती. कालांतराने कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले. परंतु पुन्हा करोनाची दुसरी लाट आली तरी कोविड सेंटर उभारण्यात आले नव्हते. एका खाजगी दवाखान्यात उपचार करणार्या वयोवृद्ध रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यातून वडूज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या कालावधीत मायणी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. तिथे पुरेशी सुविधा नसल्याने खाजगी दवाखाना व वडूज ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला रिक्षातून आणण्यात आले होते. त्याठिकाणी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करणार्या यंत्रणेचा उपयोग करून त्या रूग्णाला दिलासा देण्याचे काम झाले. हे चित्रीकरण वृत्त वहिनी वर झळकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबतचा पाठपुरावा करून वडूज व औंध याठिकाणचे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा रोजगार स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक सूरज लोहार व मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. तसेच खटाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी तातडीने वडूज व औंध याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना आरोग्य अधिकार्यांना दिल्या.
दरम्यान, वडूज ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध करण्यासाठी दर महिन्याला मागणी पत्र सादर करण्यात आले आहे. परंतु आणखी एका वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक करावी, असे यापूर्वीच कळविण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. सध्या वडूज ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाली असून ऑनलाइन नोंदणी करणार्या व्यक्तींना लस दिली जात आहे. खटाव येथील कोविड सेंटर सुरू झाले की कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे, असे खटाव तालुक्यातील जनतेला वाटू लागले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |