सातारा : मी तुला दुपटीने पैसे देतो, तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, असं म्हणून शाळेतील एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण चव्हाण (वय 48), प्रकाश चव्हाण (वय 26, रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा), सोहेल रियाज खान (वय 25, रा. शाहू कलामंदिर शेजारी सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला एका शाळेत नोकरी करते. दि.25 रोजी संबंधित महिला घरात होती. त्यावेळी तिचा मुलगाही घरात होता. यावेळी हे वरील संशयित तिघे तिच्या घरात जबरदस्तीने शिरले. मेन दरवाज्याची कडी कोयंडा तोडून हे घरात शिरले. यातील संशयित नारायण चव्हाण हे तिला मी तुला दुपटीने पैसे देतो, तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, असे म्हणाले तर खान याने तिला नारायण चव्हाण यांच्या अंगावर ढकलून दिले व तो म्हणते तसं ऐक नाहीतर तुला तुझी रक्कम परत मिळणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर धक्काबुक्की करून तु आमची तक्रार केली तर तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करू, तसेच तुझी सरकारी नोकरी घालवू, अशी धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत किरकोळ मुकामार लागला. हा प्रकार सुरू असताना पीडितेच्या घरात स्वयंपाक करायला आलेली महिला व कपडे शिवण्यासाठी नेहमी येत असणारी महिला घराबाहेर आली असता संशयित भिंतीवर थुंकून पळून गेले. या प्रकारानंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |