वाई : सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार भानुदास चिंचकर यांची वाई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी वाई मतदार संघात होतकरू व उदयोन्मुख तरुणांना एकत्र करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. यासाठी ते समाजाच्या विविध घटकातील तरुणांना पक्ष संघटना वाढवण्यासाठी पुढे आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर नंदकुमार चिंचकर यांना ओबीसी सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.
चिंचकर हे गेली वीस वर्षापासून दानेबाजार गणेशोत्सव मंडळ, बुवासाहेब यात्रा कमिटी, शिवजयंती मंडळ तसेच तेली समाजाच्या विविध उपक्रमात ते सक्रिय सहभागी असून त्यांचा शहरात मोठा जनसंपर्क आहे. आ. मकरंद पाटील यांचे ते खंदे व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
आ. पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवेन. राष्ट्रवादी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष नंदकुमार चिंचकर यांनी सांगितले. चिंचकर यांच्या निवडीबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितील पाटील, मुंबई पोलीस उपायुक्त सतीश चिंचकर, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रताप पवार, माजी सभापती प्रमोद शिंदे, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, नगरसेवक भारत खामकर, किशोर बागुल, चरण गायकवाड, प्रसाद सुर्वे, आनंदा गोखले, दीपक हजारे, मनोज चिंचकर, आक्रम बागवान, महेश डाळवाले, नितीन डाळवाले, प्रताप खामकर, राजेंद्र तांबेकर, विवेक चिंचकर, राजेंद्र विभूते आदींनी अभिनंदन केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |