03:26pm | May 12, 2021 |
श्रीकांत जाधव
चाफळ : अनेक पिढ्यान् पिढ्या डोंगर खाली-वर करून अक्षरश: झिजून मेल्या. आज रस्ता होईल, उद्या रस्ता होईल या आशेवर जगणार्या कोळेकरवाडीकरांचे रस्त्याचे स्वप्न अखेर ना. शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून सत्यात उतरणार आहे. कोळेकरवाडी गावात कडेकपारी फोडून रस्ता गावापर्यंत पोहचण्यासाठी ना.देसाई यांनी 65 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामूळे कोळेकरवाडीतील अबालवृद्धांनी ना.शंभूराज देसाईंचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
कोळेकरवाडी (डेरवण), ता.पाटण हे गाव चाफळ विभागातील डोंगरी व दुर्गम भागातील वसलेले कमी लोकसंख्या असलेल गाव डेरवण ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर येथील ग्रामस्थ रस्त्याच्या शोधात होते. अत्यावश्यक काम असेल तर किंवा गुरुवारी चाफळच्या बाजारासाठी चालत डोंगरातून वाट शोधत या ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. डोक्यावर बाजार घेऊन तेवढंच अंतर पुन्हा डोंगर चढून जायचे हा येथील ग्रामस्थांचा नित्यनेमाने एक सवयीचा भागच झालेला. कधी आपल्या गावाला रस्ता होईल, ही आशा उराशी घेऊन येथील समाज जगत होता. एक पिढी वार्धक्याकडे तर एक पिढी रस्त्याची आस घेऊन जीवन जगत होती. निवडणुका आल्या की फक्त आश्वासने. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वनविभाग असल्याने रस्त्याच्या कामासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पण अडचणी पुढे हार मानणारे कोळेकरवाडीचे ग्रामस्थ नव्हते. आपल्या पिढीला रस्त्या अभावी जे भोगायला लागले ते येणार्या पिढीच्या नशीबी नसावं, या उदात्त हेतूने रस्ता मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वन विभागातून जाणार्या रस्त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्रांचा पाठपुरावा सुरू केला. अनेक अडचणी आल्या, तरी त्यावर मात करत प्रयत्न सुरू केले. इकडे आमदार देसाई नामदार झाले आणि वनविभागाकडून परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर त्याला पहिले यश मिळाले. वन हद्दीत रस्ता करण्यासाठी वन विभागाने मान्यता दिली. लागलीच नामदार शंभूराज देसाई यांनी कोळेकरवाडी रस्त्याच्या कामासाठी मूलभूत सूविधा पूरविणे (2515-1238) अतंर्गत 30 लाख रूपये पहिला निधी मंजूर केला. नुकताच या रस्त्यासाठी दूसरा 35 लाखाचा निधी, असा एकूण 65 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. रस्ता मंजूरीसाठी ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलतचे संचालक चंद्रकांत पाटील, रवी तावरे, डेरवण च्या सरपंच मालन यादव, संजय यादव, संदीप यादव, प्रदीप पवार, हेमंत पवार, वसंत पवार, सतीश पवार, मनोहर कडव, इरफान मूल्ला व बांधकाम विभागाचे ए. एम. जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. याबरोबरच डेरवण ग्रामपंचायत तसेच चाफळ विभागातील पदाधिकार्यांनी वेळोवेळी आवश्यक ती मदत केल्याने त्यांचे आभार व्यक्त करत, केवळ गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे निधी मंजूर झाल्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याने नामदार देसाई यांचे कोळेकरवाडी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |