10:09pm | Sep 12, 2021 |
पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि शिवाजी सागर जलाशयातील संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे रविवारी सायंकाळी 5 वाजता 2.6 फुटाने उचलून 22 हजार 730 क्युसेक्स आणि धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1 हजार 50 असे एकूण 23 हजार 780 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात 29 हजार 332 क्युसेक्स प्रतिसेकंद सरासरी पाण्याची आवक सुरू आहे. 98.77 टक्के धरण भरले आहे.
दरम्यान, यापुढेही कोयना पाणलोट धरणातील पाण्याची आवक वाढली तरी आणखी याही पेक्षा ज्यादा प्रमाणात पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आली.
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कोयना धरणावर अवलंबून आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले की विजेच्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न वर्षभरासाठी मिटतो. त्यामुळे सर्वांचेच लक्ष हे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे लागलेले असते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि मुसळधार पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. जुलै महिन्यात दि. 22 व 23 रोजी कोयना परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि ढगफुटी झाली. एका दिवसात जवळपास 700 ते 750 मिलीमीटर पावसाची नोंद कोयना परिसरात होवून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता. कमी काळात चोवीस तासात कोयना जलाशयात तब्बल 16 टीएमसी एवढ्या विक्रमी प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. जवळपास चार महिन्यात कोयना धरणात 130 टीएमसीच्या आसपास पाण्याची आवक झाली होती.
कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरूवात केल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होवू लागली आहे. त्यातच 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्याच्या घडीला 103.95 टीएमसी पाणीसाठा झाला असून कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणात 29 हजार 332 क्युसेक्स प्रतिसेकंद सरासरी पाण्याची आवक धरणात सुरू आहे. तर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत नसल्याने व धरणातील पाणीसाठवण क्षमता संपुष्टात आल्याने धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला.
त्यानुसार रविवार दि. 12 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एका फुटाने उचलून सांडवा व पायथा वीजगृहातून एकूण 10 हजार 264 क्युसेक्स प्रतिसेकंद सरासरी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र सध्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे दरवाजे 2 फूट 6 इंचाने उचलून सांडवा आणि पायथा वीजगृहाद्वारे असे एकूण 25 हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आणि धरणातील पाणीसाठवण क्षमता संपुष्टात आल्याने आणखी धरणाचे दरवाजे उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोयना धरणाची सध्यस्थिती लक्षात घेता धरणात एकूण पाणीसाठा 103.95 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा 98.95 टीएमसी इतका आहे. तर पाणी उंची 2162.6 फूट व जलपातळी 569.130 मीटर इतकी झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे 17 (3999) मिलीमीटर, नवजा 37 (5259) मिलीमीटर, महाबळेश्वर येथे 25 (5317) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा पाहता वर्षभरातील सिंचन, वीजनिर्मितीची चिंता मात्र मिटली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |