10:36pm | Aug 22, 2022 |
सातारा : जोशी हॉस्पिटल प्रा. लि.. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दि. 12 ऑक्टोबर रोजी जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हॉस्पिटल 7 वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे. कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी अधिक जोमाने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूयात, असे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवाहन केले आहे.
मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.
25 ते 45 वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या 22 वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे. सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. 12 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्वांना केले आहे.
दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता सजाई गार्डन फलटण येथून 10 कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. सकाळी 6.30 वाजता सजाई गार्डन येथून 5 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता 3 कि. मी. वाकेथान (जलद चालणे) स्पर्धा सुरू होणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेत 5 ते 10 कि. मी. मध्ये सळसळता युवा गट (25 ते 45 वय वर्षे - पुरुष आणि महिला वेगळा गट) व प्रगल्भ प्रौढ गट (46 ते 65 वय वर्षे - पुरुष आणि महिला वेगळा गट) व अनुभवी जेष्ठ (65+) वयोगटासाठी 3 कि. मी. जलद चालणे असे विभाग करण्यात आले आहेत.
सकाळी 9 वाजता सजाई गार्डन कार्यालयामध्ये सर्वांचे स्वागत व अल्पोपहार, सकाळी 10.30 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरु होणार असून दुपारी 1 वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सजाई गार्डन कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी joshihospitalpvtltd.com या वेब साईट वर करता येणार आहे. प्रवेश शुल्क फक्त 300 रुपये आहे. ज्येष्ठ नागरिक यांना कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत 300 रुपये भरून marathon चे किट घेऊन जावे की ज्यामध्ये T Shirt, Runner BIB, टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट मिळेल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा.लि., फलटण तर्फे करण्यात आले आहे.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा रचनाकार !
घेऊन मॅरेथॉन 2022 मध्ये सक्रिय भाग, करूयात आपलेच भविष्य साकार!!
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |