09:48pm | Sep 13, 2021 |
फलटण : तालुक्यातील सुरवडी एमआयडीसी मधील साठ ते सत्तर पोलवरील रोड लाईट सहा महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याची, तसेच या प्रत्येक पोलवरील वायर, केबल्स उघड्या व असुरक्षित असल्याची तक्रार स्थानिकांकडुन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे करण्यात आली होती. तसेच रोडलाईट लवकरात लवकर चालु करुन उघड्या वायर, केबल्स बंदीस्त करुन कोणतीही जिवीत हानी होऊ नये यासाठी कायमचा बंदोबस्त करण्याची मागणीही प्रदिप झणझणे यांच्याकडे स्थानिकांकडुन करण्यात आली होती.
सदर समस्येचा पाठपुरावा करत असताना पुणे व कोकण एमआयडीसी विभागाचे उपविभागीय अधिकारी मलिकनेर यांच्याशी संपर्क साधुन सुरवडी येथील रोड लाईट सहा महिन्यापासून बंद असुन पोलवरील वायरींग व केबल्स उघड्या व असुरक्षित असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीविषयी सविस्तर चर्चा करुन रोडलाईट चालु नसल्याने एमआयडीसी भागात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असुन चो-या मा-या, अपघात आदी घटना याठिकाणी घडु शकतात. तसेच पोलवरील वायरींग व केबल्स उघड्या असुन तेथुन हजारो स्थानिक ग्रामस्थ, एमआयडीसीमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना, तसेच शेतक-यांची जनावरे, मेंढ्या, शेळ्या आदी सदर उघड्या वायरींग व केबल्सच्या संपर्कात आल्यास दुर्दैवाने जिवितहानी घडु शकते व याची संपुर्ण जबाबदारी ही एमआयडीसी विभागाची असेल, असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी मलिकनेर यांना स्पष्ट सांगितले.
संपूर्ण समस्या लक्षात आल्यानंतर पुणे व कोकण एमआयडीसी विभागाचे उपविभागीय अधिकारी मलिकनेर यांनी बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी यांचेशी चर्चा करुन त्यांना तातडीने सदर समस्या सोडवण्यासाठी आदेश दिले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली. बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी यांचेशी संपर्क साधुन दोन दिवसात सदर समस्या कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच निकाली काढावी, असे प्रदिप झणझणे यांनी स्पष्ट सांगितले.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |