कुर्नूल : रविवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल येथे भीषण अपघात झाला. या अपघाता एकूण १४ जण ठार झाले आणि ४ जण गंभीर जखमी झाले. येथील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर सकाळी बस आणि ट्रकची धडक झाली. ही घटना कुर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती भागातील मदारपूर गावात घडली.
या अपघातात ठार झालेल्यांमध्ये ८ महिला, ५ पुरुष आणि १ मुलाचा समावेश आहे. हे सर्व जण तीर्थयात्रेवर होते. चालकाचा मिनी बसवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला जाऊन धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.
मिनी बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. वाहन चालकाचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. कुर्नूलपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मदापुरम येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती कुर्नूलच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.
हे सर्व जण चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथून राजस्थानमधील अजमेरला निघाले होते. हा अपघात इतका गंभीर होता की प्रवाशांचे मृतदेह गाडीच्या आत दाबले गेले होते आणि मशिनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आले.
सुदैवाने, या अपघातातून ४ मुलं वाचली आहेत. पण त्यातील दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. आधार कार्ड आणि फोन नंबरच्या आधारे पोलिस प्रवाशांची माहिती गोळा करत आहेत. अपघातात मरण पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्यांविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |