08:15pm | Mar 19, 2022 |
कराड : आज विज्ञान युग असून हे स्पर्धेचे युग आहे. कोणाच्या डोक्यामध्ये कोणत्या कल्पना असतात; याला सध्या महत्त्व नसून त्या कल्पना कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच आपले कौशल्य इतरांना पाहावयास मिळते. म्हणूनच स्पर्धेच्या युगात कल्पकतेपेक्षा सादरीकरणाला महत्त्व असल्याचे मत कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी व्यक्त केले.
येथील तहसील कार्यालय पुरवठा विभाग आणि ग्राहक मंचच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून भित्तीपत्रक आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बबनराव तडवी,ग्राहक संघटनेच्या राजेघाडगे, पुरवठा विभागाचे महादेव आष्टेकर, अव्वल कारकून धुमाळ, अव्वल कारकून राजेश चव्हाण, ग्राहक मंचचे मधुकर मोरे, प्रमोद सुकरे, अशोक मोहने, विश्वास मोहिते, एडवोकेट भीमराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार पवार म्हणाले, विद्यार्थी अतिशय हुशार असतात. परंतु, ते आपले सादरीकरण करण्यात कमी पडतात. स्पर्धांमध्ये सहभागी होतात. मात्र, त्यांची कल्पकता डोक्यातच राहते. ती इतरांना समजत नाही. त्याचाच फटका त्यांना स्पर्धांमध्ये बसत असून स्पर्धेमध्ये आणि आजच्या युगात टिकायचे असेल तर कल्पना कृतीत उतरविण्याचे धाडस प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रमोद सुकरे, अशोक मोहने, विश्वास मोहिते, प्रा. पांडुरंग यादव यांनी काम पाहिले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा.प्रमोद सुकरे यांनी मार्मिक उदाहरणे देऊन कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी सादरीकरण किती महत्वाचे आहे ते विशद केले. स्वागत प्रास्ताविक अव्वल कारकून युवराज पाटील यांनी केले. अव्वल कारकून राजेद्र चव्हाण यांनी आभार मानले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |