03:19pm | Sep 28, 2021 |
सातारा : प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित 5 व्या ‘प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2021 च्या प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान सोहळ्य़ात सातारच्या योग व निसर्गोपचार तज्ञ उमा सुभाष चौगुले यांना ‘प्रतिष्ठा योगरत्न पुरस्कार' ने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा तासगाव, जि. सांगली येथे पार पडला. यावेळी संमेरनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शेखर गायकवाड व स्वागताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते उमा चौगुले यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
5 व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सातारच्या उमा चौगुले यांचा प्रतिष्ठा योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सातारच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला गेला आहे. उमा चौगुले यांनी गेली 22 वर्षे बालकांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच त्यांनी योगाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्ररत्न केला आहे. योग ही केवळ साधना नाही तर आजच्या वेगवान जगाची मानसिक व शारिरीक गरज आहे, हे त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून पटवून दिले आहे, याचीच दखल घेत त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उमा यांच्या 22 वर्षाच्या योग प्रचार आणि प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्सच्या अधिकृत योग पंच परिक्षक म्हणून ही त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातच त्यांना नुकतेच ‘प्रतिष्ठा योगरत्न पुरस्कार' ने गौरविण्यात आल्यासंबंधी त्यांना सर्व स्तरातुन गौरविण्यात येत आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |