02:42pm | Sep 12, 2021 |
सातारा : सातारा तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या तालुक्याच्या वन विभागाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असता, गेल्या काही वर्षात तालुक्याच्या वनविभागाच्या हद्दीत वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांची नोंद पाहायला मिळाली. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर प्लॅन तयार करण्याचा आपला मानस असून भविष्यकाळात तालुक्यामध्ये गस्ती पथक अधिक सजग करण्यासह खबऱ्यांचे जाळे सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सातारा तालुक्याच्या वनविभागाचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी दिली. वनविभागाच्या हद्दीत एखाद्या वन्य प्राण्यांची शिकार झाल्यास त्याबाबत तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, त्याचे नाव अत्यंत गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
निवृत्ती चव्हाण पुढे म्हणाले, सातारा तालुक्याला सह्याद्री पर्वत रांगांची जोड मिळाली आहे. सातारा शहर परिसर, यवतेश्वर, परळी खोरे, सज्जनगड फाटा ते जांभे येथील पठार परिसर, तसेच तालुक्यातील औद्योगिक वसाहत, देगाव, शेंद्रे, वर्णे परिसर सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी व्यापून गेला आहे. मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती, घनदाट जंगल त्यामध्ये बिबट्या, अस्वल, सायाळ, रानगवे, रान डुक्कर, ससे, हरीण, भेकर, नाणगे या वन्य प्राण्यांसह राष्ट्रीय पक्षी म्हणून समावेश असणाऱ्या अनेक मोरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. मुळात मुबलक साधन संपत्ती ही आपल्यासाठी नैसर्गिक देणगी आहे. वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे जतन करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्याचे अनेक जण पालन करीत असतात, याबद्दल कोणतेही दुमत नाही.
गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांची झालेली शिकार अथवा शिकारीचे प्रयत्न याची आकडेवारी पाहिली असता शिकारीला अटकाव करण्यासाठी एक ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाल्याची भावना आपल्याला सतावत आहे. विशेष म्हणजे काहीजण हौस म्हणून तर काहीजण पैसे मिळवण्याचे माध्यम म्हणून वन्य प्राण्यांची शिकार करीत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हौस अथवा उपजीविकेचे साधन म्हणून वन्य प्राण्यांची शिकार करणे म्हणजे निसर्गाशी प्रतारणा करणे एवढेच नसून वन्यप्राण्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती समवेत वन्य प्राण्यांचे जतन करणे हे वन विभागाचे कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू.
यापुढे सातारा तालुक्यात एकाही वन्यप्राण्यांची अथवा राष्ट्रीय पक्षाची शिकार होणार नाही यासाठी वन विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर प्लॅन तयार करण्याच्या हालचाली आपण आजपासून सुरू करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून गस्ती पथक अधिक सजग करण्यात येणार आहे. या पथकाच्या कामकाजाची रुपरेषा अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून हे पथक कधी आणि कोठे सक्रीय करायचे याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर घेण्यात येणार आहे.
दुर्गम जंगलात अथवा पठार भागात एखाद्या वन्य प्राण्यांची शिकार झाल्यानंतर त्याबाबतची माहिती असतानाही ती देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मुळात वन्यप्राणी ही राष्ट्रीय संपत्ती असून या संपत्तीचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, या भावनेतून सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. शिकारीना अटकाव आणण्याच्या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांचा फार मोठा वाटा राहणार आहे. एखाद्या ठिकाणी एखाद्या वन्य प्राण्यांची शिकार झाल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावी. त्यांचे नाव अत्यंत गोपनीय ठेवण्याची पुरेपुर काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याच बरोबर खबऱ्यांचे जाळे सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे निवृत्ती चव्हाण यांनी सांगितले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |