04:21pm | Sep 06, 2020 |
नवी दिल्ली: संपूर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना विषाणूने भारतात सर्वाधिक कहर सुरू केला आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत आता जगात भारतापुढे फक्त अमेरिका आहे. भारतात करोना विषाणूने 40 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा हा 62 लाखांच्या पार पोहोचला आहे. तर 1 लाख 87 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 22 लाख 83 हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या देशात अद्याप 37 लाखांहून अधिक करोनाबाधित लोक आहेत. ब्राझिलमध्ये बाधितांचा आकडा हा 41 लाखांच्या जवळपास आहे. तर 1 लाख 25 हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 34 लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर 5 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझिलला मागे टाकल्याचे समोर आले.
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या 40 लाख 23 हजार 179 वर पोहोचली आहे. आजवर 69,561 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात शनिवारी आजवर सर्वाधिक 86,432 प्रकरणं समोर आली आहेत. भारताने आता ब्राझिललाही मागे टाकलं आहे.
महाराष्ट्राला देशात सर्वाधिक करोनाचा फटका बसला आहे. राज्यात 8 लाख 63 हजारांहून अधिक बाधित रुग्ण आहेत. सुमारे 26 हजार लोक या आजाराचे बळी पडले आहेत. यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे 4 लाख 76 हजारांहून अधिक करोनाबाधितांची प्रकरणं समोर आली आहेत. तर 4200 हून अधिक लोकांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |