05:30pm | Jun 17, 2021 |
सातारा : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला हरताळ फासत कुडाळ व करहर औट पोस्ट पोलीस ठाण्याच्या परिसरातच जोमाने दारुविक्री होत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जावली तालुक्यातील अवैध दारुविक्री कायमस्वरुपी बंद करण्यात यावी. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम दारुमुक्त झालेल्या जावली तालुक्यात सध्या अवैधरित्या देशी- विदेशी बनावट मद्याचा महापूर वाहत आहे. तसेच याठिकाणी अवैध दारुविक्री जोमात सुरु आहे. जावली तालुक्यातील विशेषत: कुडाळ व करहर आऊट पोलीस स्टेशन या भागात तेथील पोलिसांच्या आशिर्वादाने जोरदार अवैध दारुविक्री सुरु आहे. या बनावट व अवैध दारुविक्रीमुळे लोकांच्या जिवीतास हानी होण्याचा धोका नाकारता येण्याजोगा नाही. तरी हे अवैध दारु व्यवसाय कायमस्वरुपी बंद करुन हे व्यवसाय चालविणार्यांना कठोर शिक्षा करावी. जेणेकरुन लोकांच्या मनात कायद्याविषयी आस्था निर्माण होईल. या अवैध धंद्यांमुळे व संबंधितांच्या दादागिरीमुळे स्थानिकांच्या जीवितास धोका आहे. त्यांच्या दादागिरीला घाबरुन कोणीही यासंबंधी तक्रार देण्यास पुढे येत नाही. तरी आपण पुढाकार घेवून याबाबतची चौकशी करावी.
हे अवैध धंदे जावली तालुक्यातील सरताळे, कुडाळ, हुमगाव, करहर, सोमर्डी, सोनगांव, सायगांव, आनेवाडी, आखाडे, महिगाव, केळघर, शेते, खर्शी बारामुरे या भागात जोमाने सुरु आहेत. तरी आपण या अवैध दारुधंद्यांच्या चालक-मालकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हांस आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे सरदार भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |