पुसेगाव: रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या येथील निरामय हॉस्पिटलच्या डॉ.विवेक गायकवाड व डॉ. वर्षा गायकवाड यांनी सद्यपरिस्थीतीचे गांभीर्य ओळखून येथील 50 गरीब व गरजू कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासनाच्या लॉकडाऊनमधून सावरत असतानाच कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. याचा सर्वात जास्त फटका छोटे धंदेवाले, मजूर व हातावर पोट असणार्या श्रमिकांच्या कुटूंबांना बसला आहे. अनेकांना रोजगार नसल्याने कुटूंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या चिंतेत असणार्या पुसेगाव येथील 50 गरीब व गरजू कुटूंबाना निरामय हॉस्पिटलचे डॉ.विवेक गायकवाड व त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा गायकवाड यांनी प्रत्येकी 550 रुपयांच्या किराणा मालाच्या साहित्याचे वाटप केले आहे.
वाटप साहित्यात एक लिटर गोडेतेल, अर्धा किलो तुरडाळ, अर्धा किलो मुगडाळ, चहापावडर, दोन किलो तांदुळ, बिस्कीटपुडे, मॅगी, अंगाचा व कपड्यांचे साबण यांचा समावेश आहे. डॉ. विवेक गायकवाड यांच्यातर्फे दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन, गर्भसंस्कार शिबीर असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. सध्या कोविड सारख्या गंभीर परिस्थितीत निरामय हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी पुर्ण वर्षभर आपली वैद्यकीय सेवा अविरत बजावलेली आहे. रुग्णसेवेबरोबरच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गरीब व गरजूंना चरितार्थासाठी किराणा साहित्याचे वाटप करणार्या डॉक्टर दांपत्यांचा हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |