नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आहे. यामुळे सर्वमान्य नागरिकांचे उत्पन्न बंद झाले. अशा परिस्थितीत आर्थिक घडी बसवू पाहणार्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढू लागला आहे. सलग सोळाव्या दिवशी इंधनदरवाढ सुरूच आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर पडू लागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 80 रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर 79 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली. ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 33 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 79 रुपये 56 पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 58 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून 78 रूपये 85 प्रति लिटर इतके झाले आहेत.
रविवारी (21 जून) पेट्रोलच्या दरात 35 पैशांची, तर डिझेलच्या दरात 60 पैसे वाढ करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 7.97 रुपये तर डिेझेलच्या दरात 8.88 रुपयांची वाढ झाली आहे. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
करोनाची स्थिती आणि थांबलेले अर्थचक्र लक्षात घेऊन मे पासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असल्या तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |