04:58pm | Nov 12, 2020 |
नवी दिल्ली : दिवाळी सणामुळे सध्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरबदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. निष्काळजीपणा दाखवत गर्दीत मिसळणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे लोकांनी सावधानता बाळगायला हवी, असा सल्ला एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
गर्दीत एका व्यक्तीनंही मास्क परिधान करण्यात टाळाटाळ केली असेल आणि तो कोविड पॉझिटिव्ह असेल तर असा व्यक्ती एकाच वेळेस अनेकांना करोना संक्रमित करू शकतो, असंही डॉ. गुलेरिया यांनी म्हटलंय. करोना संक्रमित व्यक्ती जिथे जातील तो संपूर्ण भाग आणि त्यांच्या नातेवाईकांना संक्रमणाचा धोका कायम राहील, असे लोक कोविड 19 चे ‘सुपर स्प्रेडर’ म्हणून काम करतात.
‘सुपर स्प्रेडर’ची संख्या सध्या दिल्लीत जास्त असू शकते, अशी शक्यताही डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलीय. याचं कारण म्हणजे, दिल्लीत लोक घराच्या बाहेर पडून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. तसंच सण-समारंभातही सहभागी होत आहेत. काळजी न घेण्याचा निष्काळजीपणाही लोकांत दिसून येतोय, असंह तज्ज्ञांनी म्हटलंय.
सणासुदीच्या दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांमुळे बाजारांत बेहिशोबी गर्दी जमाताना दिसतेय. अशावेळी अधिक सावधनता बाळगण्याची आणि जितकं शक्य असेल तितकं या गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
याचाच अर्थ, आपली सुरक्षितता आपल्याला सुनिश्चित करायची आहेत. तपमान बदल आणि वायू प्रदूषणामुळे अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. सण-समारंभातील गर्दी ध्यानात घेता अशा उत्सवांपासून दूर राहणंचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल, असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |