12:53pm | Aug 07, 2020 |
सातारा : जिल्हा रूग्णालयात गर्भपाताची घटना झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सलग चौथी मुलगी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर कृत्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा सल्लागार समिती व त्रिसदस्यीय समिती यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करत गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिव्हिल प्रकरणात लेक लाडकी अभियानाच्यावतीने प्राथमिक माहिती घेतली आहेे. मिळालेली माहिती धक्कादायक असून सिव्हीलमधील घडलेली घटना बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहेे. गर्भपात झालेली संबंधित महिला कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील आहेे. त्या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत. दि.27 जुलै रोजी गर्भपात केलेली सुद्धा मुलगी म्हणजे चौथी मुलगी असल्याने तिचा गर्भपात करण्यात आला आहे. दहा दिवसानंतर सिव्हीलच्या स्वच्छता गृहाचे ड्रेनेज चॉकअप झाले. हे चॉकअप काढण्यासाठी प्रयत्न केले असता टॉयलेटमध्ये मानवी भ्रूण आढळून आले. यावेळी एका कर्मचार्याने या घटनेचा व्हिडीओ केला.
तब्बल दहा दिवसानंतर प्रसिद्धी माध्यमाच्या समोर ही घटना उघड झाली. गर्भपात केलेल्या महिलेची सोनोग्राफी कोणत्या लॅबोरेटरीत झाली? हे भ्रूण ड्रेनेजमध्ये आढळले कसे? यासाठी सिव्हिलमधील कोणत्या डॉक्टरने वा खासगीमधील डॉक्टरने मदत केली? या भ्रूण हत्येसाठी नक्की कोठून औषधे मिळाली? अशाप्रकारे त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. सिव्हिलमध्येच असे प्रकार होत असल्याने ही बाब चिंताजनक आहे. सदर प्रकरणाचे गर्भलिंग केल्यानंतर गर्भपात केला आहे. त्यामुळे ती, तिचा पती, सासू-सासरे यांच्यासह गर्भलिंग करण्यास मदत करणार्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार जिल्हा रुग्णालयात घडलेला असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर हे जबाबदार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्वरित निलंबित करण्यात यावे. अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार आहे, असेही अॅड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ करणार्या कर्मचार्याला निलंबित करण्यात आले आहे. ही बाब पुर्णत: चुकीचा आहे. यामुळे ‘चोर ते चोर अन् शिरजोर’ असा कारभार डॉ. गडीकर यांचा सुरु आहे. प्रशासनाने आम्ही दिलेले निवेदनच नोटीस समजावे, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी अॅड. शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, मालन कांबळे, कैलास जाधव उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |