01:48pm | May 26, 2020 |
पुसेगाव : पिकांच्या ४० ते १०० टक्क्यांपर्यंतच्या नुकसानिस कारणीभूत ठरणाऱ्या हुमणी किडीच्या बहुतांश अवस्था जमिनीखाली पार पडतात. त्यामुळे पिके उगवल्यानंतर रासायनिक फावरण्यांवर शेतकऱ्यांचा होणारा आर्थिक खर्च व शेतपिकाचे नुकसान टाळण्याकरिता मान्सूनपूर्व सांघिक पद्धतीने प्रकाश सापळे लावून नियंत्रण केल्यास भविष्यात येणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. असे प्रतिपादन कृषी सहायक संतोष नेवसे यांनी केले.
नेर ता. खटाव येथील शिवाजी पवार यांच्या शेतावर हुमणी नियंत्रणाकरिता प्रकाश सापळे बसविण्याचे प्रात्यक्षिक व चर्चासत्रात नेवसे बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले नदीकाठावरील हुमणी व माळरानावरील हुमणी आशा हुमणीच्या दोन प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यापैकी माळावरील हुमणीमुळे जास्त नुकसान होते. या प्रजातीच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट हा काळ महत्वाचा असतो. हुमणीच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोष व भुंगेरा या चार अवस्था आढळतात. डिसेंबर-जानेवारी मध्ये सुप्त अवस्थेत गेलेले भुंगेरे कोष बनून उन्हाळभर जमिनीत राहतात. मान्सूनपूर्व उन्हाळी पाऊस व ढगाळ वातावरणात सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भुंगेरे बाहेर पडतात. नर व मादी भुंगेऱ्याचे मिलन होऊन, मादी जमिनीत १० सेमी खोलीवर सरासरी ६० अंडी घालते. शेतात एकरी दहाहजारांच्या पुढेअळ्या असतील तर ४० ते १०० टक्के नुकसान होते. अशा हुमणीचे सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सांघिक पद्धतीने प्रकाश सापळे लावून नियंत्रण करता येते. त्याकरिता शिवारातील ४ ते ५ एकर क्षेत्राकरिता एक प्रकाश सापळा लावावा. तो लावताना मोटा टफ किंवा प्लास्टिकचा कागद लावून त्यात पाणी साठवावे. पाण्यामध्ये रॉकेल किंवा डिझेल टाकून ठेवावे. त्याच्यावर चार ते पाच फूट उंचीवर लाईटचा बल्ब सोडावा. हुमणीचे भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होऊन रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात. अशाप्रकारे होणारे संभाव्य नुकसान शून्य खर्चात कमी करता येऊ शकते.
हुमणी नियंत्रणाकरिता उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यात व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत असून, हुमणीच्या नियंत्रणाकरिता गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषीसहाय्यक हरिदास भोसले यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना कृषी विभागाच्या वतीने थेट बांधावर हुमणी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दिले जात आहे. यामुळे या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक परिसरातील शेतकऱ्यांनी केले. यावेळी प्रत्यक्ष मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास शंकर जगदाळे, शिवाजी पवार, सचिन पवार, दादा शिर्के, हनुमंत पवार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |