सातारा : खटाव तालुक्यातील वडूज येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी 12 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदार ग्रामसेवक याच्याकडे कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने कारवाई न करण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. संजय विलासराव सोनावले वय 56 राहणार सातारा मूळ राहणार पाली, तालुका कराड असे विस्तार अधिकार्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले (सध्या रा.केसकर पेठ, सातारा. मूळ रा. पाली ता.कराड, सातारा) याने कारणे दाखवाची नोटीसच्या अनुषंगाने कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून 12 हजार रुपयांची लाच घेतली. वडूज पंचायत समितीच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडून कारवाई केली. दरम्यान, संशयिताला एसीबी विभागाने अटक केली असून शासकीय नोकरीच्या ठिकाणी त्रास देवून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार ग्रामसेवक आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, संशयित विस्तार अधिकारी सोनावले हा पंचायत समितीच्या कामकाजामध्ये चुका काढून त्यांना मानसिक त्रास देत होता. तसेच वरिष्ठांना कसूरी अहवाल पाठवून निलंबित करु, अशा धमकीही देत होता. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना विस्तार अधिकारी सोनावले याने कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसीमध्ये कारवाई न करण्यासाठी संशयित सोनावले याने लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांनी तक्रार घेवून तपासाला सुरुवात केली. तक्रारीची पडताळी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम गुरुवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने वडूज पंचायत समितीमध्ये सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने सोनावले याला रंगेहाथ पकडले. एसीबी पथकाने संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. यानंतर संशयित सोनावले याला अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक पुणे अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सातारा उज्वल वैद्य, पोलीस हवालदार प्रशांत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, पोलीस हवालदार निलेश चव्हाण, मारुती अडागळे यांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |