10:38pm | Mar 02, 2023 |
फलटण : फलटण विभागातून मागील पाच वर्षात एकूण 356 ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले होते. चोरीला गेलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मागील पाच वर्षात 287 ट्रान्सफॉर्मर आले होते. मात्र 100 केव्ही चे 58 ट्रान्सफॉर्मर कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जळलेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी वेळ लागत होता. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. त्यामुळे लगेचच ऊर्जा विभागाकडून एकाच दिवसात 58 ट्रान्सफॉर्मर फलटण मध्ये दाखल झाले असून अधिकारी व शेतकऱ्यांनी खासदार रंजितसिंहाच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या की ट्रान्सफॉर्मर दिले जात नाहीत. त्यानंतर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत ऊर्जा विभागाला हे 58 ट्रान्सफॉर्मर देण्याची मागणी खासदारांनी केली. ऊर्जा मंत्रालयातील आयुक्त, संचालक यांनी त्वरित या मागणीची पूर्तता करून फलटण विभागाला तात्काळ 58 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी करताच हे ट्रान्सफॉर्मर मिळाल्याने फलटण तालुक्यातुन समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागात साहित्य व ट्रान्सफॉर्मर व इतर बाबी उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नुकतीच केंद्रीय ऊर्जा विभागाच्या कमिटी मध्ये निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याने त्यांनी महावितरण ला ट्रान्सफॉर्मर व इतर सामग्री उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सर्व वायरमन लोकांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व वायरमन उपस्थित होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |