वाई : तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिदुर्गम भागात असणार्या जोर या खेड्यानजिक धनगर वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी बिबट्याने बैलावर हल्ला केला. या हल्ल्यात बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात या घटनेने घबराट पसरली आहे. वनविभागाने बिबट्याला त्वरित पकडण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, धनगर वस्तीवर राहणारे गणेश पाकु ढेबे हे शेतकरी नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.16) धनगर वस्ती लगत असणार्या आपल्या शेतामध्ये गेले होते. सोबत शेतीकामासाठी बैलही घेऊन गेले होते. सायंकाळी साडे सहा वाजता काम संपून ते घरी येत असताना अचानक लगतच्या दाट जंगलातून आलेल्या बिबट्याने बैलावर हल्ला चढवला. यामध्ये गंभीररीत्या जखमी होऊन बैल जागीच ठार झाला. गणेश ढेबे यावेळी जीव वाचवण्यासाठी घराकडे पळून गेले.
धनगरवस्ती, जोर हा वाई च्या पश्चिम भागातील दुर्गम भाग असून या परिसरात घनदाट जंगल आहे, या जंगलात अनेक रानटी हिंस्त्र प्राणी राहत असून या भागात बिबट्याचा ही वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले आहे, बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने कोणालाही कळायच्या आतमध्ये बिबट्याने आपला डाव साधून बैलाचा जीव घेतला, ग्रामस्थांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली, परंतु गरीब शेतकर्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. वनविभागाकडून संबधित शेतकर्याला नुकसान भरपाई म्हणू चाळीस हजार देण्यात येणार आहेत, असे वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले आहे, या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांच्या दावणीला शेळी, मेंढी, म्हैस, गाय, व बैल अशी जनावरे पाळलेली आहेत, त्यांच्या निघणार्या दुधावर लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो, त्यांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही, भात पिक आणि पाळीव जनावरे हाच मुख्य व्यवसाय असल्याने बिबट्याच्या अचनाक होणार्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे, तसेच नागरिकांचाही जीव टांगणीला लागलेला आहे.
याबाबतची कल्पना वाई वनविभागाला दिल्यानंतर बुधवारी वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली होती.
दरम्यान या प्रकारामुळे जोर भागात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या या भागात गहू काढणी व भरडनीची कामे सुरु असल्याने शेतकरी आपल्या जनावरांसह दिवसभर शेतात काम करीत असतात. अशा वेळी बिबट्याने हल्ला केल्याने भीतीपोटी गेली दोन तीन दिवसांपासून शेतकरी शेतात जाण्यस घाबरत आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वनविभाग त्यांना त्वरित नुकसान भरपाई देणार आहे, जांभळी पासून त्या परिसरातील जंगली भागात बिबट्यासह काही जंगली हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे, तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांसह स्वतःचे रक्षण करावे. त्यातूनही नुकसान झाल्यास वनविभाग शेतकर्यांवर अन्याय होवू देणार नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल, वाई च्या वनविभागात तशी नोंद करण्यात यावी
- महेश झांजुर्णे (वनक्षेत्रपाल,वनविभाग वाई)
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |