11:02pm | Sep 15, 2020 |
कराड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी 25 हजार रुपयांच्या रोकडसह दोन मोबाईल संच असा 37 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत पंपावरील सचिन मारूती पवार (वय 34 रा. उंब्रज, ता. कराड), पंपाचे मॅनेजर कृष्णात साळुंखे (रा. वडोली भिकेश्वर, ता. कराड) हे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, उंब्रज नजीक असणार्या शिवडे ता.कराड गावचे हद्दीत महामार्गावर एस. के. पेट्रोल पंप आहे. सोमवारी दि. 14 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून सहा जण तोंडाला गमचा तसेच मास्क लावून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले. सदर अज्ञातांनी दोन दुचाकीमध्ये पेट्रोलने पूर्ण टाक्या भरून घेतल्या. त्यांनी 1 हजार 870 रूपयांचे पेट्रोल दोन्ही गाड्यात भरले. आणि पंपावरील कर्मचार्यास एटीएम कार्ड असल्याचे सांगून स्वॅप मशीनची मागणी केली. पंपाचे मॅनेंजर साळुंखे यांनी पंपाच्या ऑफिसमधून स्वॅप मशीन आणले. त्याच्याकडे कार्डची मागणी केली असता, त्यातील एकाने थेट मॅनेंजर साळुंखे यांच्या डोक्यास गावठी कट्टा लावून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. इतरांनी दुसर्यास मारहाण करत दोघांनी पंपाच्या केबिनमध्ये ढकलत नेले. यावेळी कर्मचारी सचिन पवार यांच्या डोक्यात पाण्याचा झार व खुर्ची मारुन त्याला गंभीर जखमी केले. गावठी कट्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करून कर्मचारी पवार यांच्या खिशातील 18 हजार रूपयांची रोकड व मॅनेंजर साळुंखे यांच्या खिशातील रोकड अशी मिळून 25 हजारांची रोकड काढून घेतली. तसेच 7 हजार रूपये किंमतीचा सँमसंग व 5 हजार रूपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा असे सुमारे 12 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा मिळून सुमारे 37 हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |