सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सह.बँक लि., मुंबई कार्यकारी संचालक डॉ.अजित देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी डॉ.अजित देशमुख यांचा शाल, पेढे व बुके देवून सत्कार केला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा बँकांमुळे उभी असून बँकेच्या कामकाजामध्ये जिल्हा बँकांचे योगदान मोठे आहे. कृषि व ग्रामीण अर्थ व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी व सहकार समृध्दी करण्यासाठी राज्य बँक सदैव जिल्हा बँकांच्या पाठीशी आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आदर्शवत कामकाज हे इतर सहकारी बँकांना मार्गदर्शक ठरत असेलेचे गौरवोद्गार डॉ.अजित देशमुख यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले.
डॉ.अजित देशमुख म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातच नव्हेतर देशात नावलौकिक प्राप्त बँक आहे. बँकेने कोअर बँकिंग प्रणालीचे माध्यमातून ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे. या बँकेची कार्यपध्दती उत्कृष्ठ असलेमुळे आम्ही इतर बँकांना बँकेची कार्यपध्दती पाहणेसाठी सूचित करीत असतो. आरबीआय, नाबार्ड यांचे मार्गदर्शक सूचनानुसार बँकेचे कामकाज चालते. बँक कोणत्याही कार्यालयाने मागविलेली माहिती तत्पर उपलब्ध करुन देते ही अत्यंत चांगली बाब असून अधिकारी प्रशिक्षित व अभ्यासू आहेत. कोणत्याही संस्थेचा विकास हा गुणात्मक व दर्जात्मक कार्यपध्दतीमुळे होत असतो, व गुणात्मक कार्यपध्दतीमुळे संस्थेला नावलौकिक प्राप्त होत असतो. या बँकेचे संचालक मंडळ अभ्यासू असून आहे. जिल्हा मध्य. सहकारी बँकांची व्यापक परिषद घेऊन या परिषदेचे माध्यमातून सहकारी बँकांच्या अडचणी जाणून घेता येईल असा मानस यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.
सातारा जिल्हा बँक ही राज्य तसेच देशपातळीवर नावाजलेली बँक असलेचा अभिमान असून बँक नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासून कामकाज करत असलेबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. यापुढील काळातही ही बँक उत्तरोत्तर प्रगती पथावर रहावी, ही शुभकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे म्हणाले, सेवेतील सातत्य व कामकाजातील गुणवत्ता यामुळे देशातील व परदेशातील विविध मान्यवर, बँकिंग व सहकारी क्षेत्रातील संस्था यांना रिझर्व्ह बँक, नाबार्ड व देशपातळीवरील महत्वपूर्ण आर्थिक संस्था यांचेमार्फत अभ्यासासाठी निमंत्रित केले जाते. यामुळे या बँकेसही त्या देशातील व त्या प्रांतातील सहकारी बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करता येतो तसेच या बँकेची यशस्वीता प्रत्यक्ष भेटीमुळे परदेशी पाहुण्यांना अनुभवता येते. अनुभव व विचारांची देवाण-घेवाण झाल्यामुळे पुढील कामकाजासाठी दिशा प्राप्त होते. आज ही प्रगल्भता या बँकेस प्राप्त झाल्यामुळे कृषी व सहकाराचा गौरव होत असल्याचे दिसून येते.
राजीव गाढवे म्हणाले, राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून देशमुखसाहेब यांनी पदभार स्विकारलेनंतर त्यांचे कामकाजाचे उत्कृष्ठ कार्यपध्दतीमुळे राज्य बँकेच्या ठेवी, कर्ज, गुंतवणुक व व्यवसाय इत्यादि गुणात्मक वाढ झाली आहे. २०१६ साली झालेल्या नोटाबंदीमध्ये बँकेला त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. राज्य सहकारी बँकचे कामकाज अनुषंगाने नेहमीच चांगले सहकार्य व मार्गदर्शन असते. शिखर बँक म्हणून राज्य बँकेच्या प्रशिक्षण संस्थेचा सहकारातील अधिकारी, कर्मचारी यांना नवीन बाबींचे प्रशिक्षण दिले जाते व त्याचा त्यांना दैनंदिन कामकाजात चांगला लाभ होत आहे. राज्य बँके मार्फत जिल्हा बँकांना देत असलेल्या सेवांचे व्याजदर, चार्जेस कमी करावेत असेही यावेळी गाढवे यांनी सूचित केले. यशवतंराव चव्हाण, आर डी पाटील, बाळासाहेब देसाई, आबासाहेब वीर, इत्यादि महान नेत्यांचे विचारांतून या बँकेची स्थापना झालेली असून बँकेला सुरुवातीपासून चांगले नेतृत्व व पाठबळ लाभले असलेने बँकेचा गुणात्मक विकास झाला आहे. बँकेने बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करण्यासाठी रु ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |