12:12pm | Jul 02, 2022 |
अकोला : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर काही आमदारांनी बंडखोरी करत २० जून रोजी रात्री थेट सूरत गाठलं आणि राज्याच्या राजकारणात सत्तानाट्य सुरू झालं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यास यंदा आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, याची राज्यभरात चर्चा सुरू होती. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं आणि राजकीय नाट्य संपुष्टात आले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच विठुरायाची पूजा करणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
'यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे करणार आहेत. मात्र शासकीय पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास मग सर्व काही समोर येणार आहे. मात्र भाजपच्या देवेंद्र फडणवीसांवर पांडुरंग का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे,' असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
सरकार नेमकं भाजपचं की शिवसेनेचं
'काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री करणार, असं सुचवलं होतं. परंतु आता विठ्ठलानं एकनाथाला बोलावलं. त्यामुळे आता सरकार नेमकं भाजपचं की शिवसेनेचं आहे, याचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावं,' असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |