09:58pm | Nov 29, 2020 |
फलटण : दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या वेशात येऊन सराफाचे दुकान गोळीबार करत लुटणार्या दरोडेखोरांच्या टोळीतील आरोपींचा सुगावा लागल्याने, आज त्यांचा पाठलाग करताना, फलटण जवळ वडले गावात एपीआय लांडे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले असून, दोन दरोडेखोर पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून ऊसाच्या शेतात पसार झाले आहेत. यामध्ये सर्व पोलिस पथक सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही. फरार आरोपींचा शोध पुणे ग्रामीण आणि फलटण पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वडले हे गाव फलटण-शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून नऊ किमी अंतरावर आहे. 26 ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सराफ व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांच्याकडील 11 लाख 66 हजारांचे दागिने अज्ञातांनी जबरदस्तीने चोरुन नेले होते.
याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती. 25 ऑक्टोबरला दसर्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणार्या कुलथे याना उदघाटनाच्या दुसर्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे. दरम्यान, सपोनि लांडे हे सहकार्यांसह रविवारी तपासाला फलटण तालुक्यात गेले होते. या प्रकरणातील संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्याना मिळाली होती. लांडे यांनी यापूर्वी फलटणमध्ये काम केले आहे. त्यामुळे या भागाची चांगली माहिती त्यांना आहे.
वडले येथे गेल्यावर गावठी पिस्तुलातून त्यांच्यावर संशयिताने गोळीबार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, या घटनेत कोणीही गंभीर झालेले नाही. छर्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |