02:10pm | Jun 23, 2022 |
मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचा थरार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मीडियासाठी नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस शेवटचा धक्का द्यायच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजपची एकनाथ शिंदेना ऑफर? भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.
42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मागच्या 12 तासांमध्ये शिवसेनेचे 8-10 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तर आणखी काही आमदार दाखल होण्याची प्रतिक्षा एकनाथ शिंदे यांच्या गटाला आहे.
मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार तर आशिष जयस्वाल हे अपक्ष आमदार काही वेळापूर्वीच गुवाहाटीला पोहोचले आहेत. याआधी काल रात्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार तसंच मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले. दुसरीकडे दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईतून वाचायचं असेल तर शिंदे गटामध्ये शिवसेनेचे दोन-तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे. म्हणजेच शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 37 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणं गरजेचं आहे.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |