04:37pm | Jul 23, 2020 |
नवी दिल्ली: राज्यसभेमधील नवनिर्वाचित सभासदांचा शपथविधी काल राज्यसभेमध्ये झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! या घोषणेवरून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली होती. यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. यावर आज व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यात ते म्हणाले की, शिवरायांबाबत मला आदर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. काल राज्यसभेमध्ये शपथविधीवेळी मी जी सूचना केली ती परंपरेला अनुसरून होती. शपथविधीवेळी कुठल्याही घोषणा देण्यात येत नाही. यामध्ये कुणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती.’’
यावेळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष केला. मात्र त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी आपल्या चेंबरमध्ये अशा घोषणा देऊ नयेत, अशी समज दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |