03:11pm | Nov 27, 2020 |
सातारा: पदवीधर व शिक्षक निवडणूक 2020 ही शांततेत पार पाडावी. तसेच या निवडणुकीसाठी काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यांत, अशा सूचना निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या.
निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी आज पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन श्रीकांत देशपांडे पुढे म्हणाले, मतदारांना मतदान केंद्रावर कुठल्याच अडचणी निर्माण होणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच मतदानाविषयक काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 100 अधिकारी, कर्मचारी काम करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 231 सूक्ष्म निरीक्षक नेमले असून 51 झोनल ऑफीसर नेमले आहेत. वाहतुक व्यवस्थेची जयत तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक मदान केंद्र मतदानच्या आदल्या दिवशी सॅनिटायझर करण्यात येणार असून कार्यकरत अधिकारी, कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे व प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी या आढावा बैठकीत सांगितल.
प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकही संवेदनशिल मतदान केंद्र नाही. आत्तापर्यंत आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आढावा बैठकीत सांगितले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |