10:55pm | Jul 08, 2020 |
कराड : शासन कृषी विभागाकडे शेती विकासाच्या अनेक योजना आहेत. कोरोनाच्या संकट काळात झालेल्या नुकसानीतून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी कृषी विभाग तत्पर आहे. शेतकर्यांनी कृषीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कराड पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम यांनी केले.
शासन कृषी विभागतंर्गत सैदापूर मंडल कृषि विभागाच्या माध्यमातून वडगाव हवेली, दुशेरे व शेणोली येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेणोली (ता.कराड) येथील कार्यक्रमात निकम बोलत होते.
मंडल कृषी अधिकारी डी. एच. येळे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत संपूर्ण राज्यभरात एक ते सात जुलै हा कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहात शासन सर्वसामान्य शेतकर्यांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी मुंढे येथील कृषि महाविद्यालयातील संशोधक प्रा. बुलबुले यांनी ऊस, सोयाबीन व भात पिकातील किड व रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक पंडीत मोरे, सहाय्यक हेमंत धापटे, विनोद कदम यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी सप्ताहामध्ये शेतकर्यांना शेतीशाळा, पंतप्रधान पिक विमा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून बांधावर फळझाडे लागवड, नाडेफ कंपोस्ट युनिट गांडूळ खत उत्पादन युनिट, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदिंबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास कृष्णेचे संचालक धोंडीराम जाधव, अशोकराव जगताप, दुशेरेच्या सरपंच सुमन जाधव, वडगाव हवेलीचे उपसरपंच राजेंद्र थोरात, भगवान जगताप, जे. जे. जगताप, भाऊसाहेब जगताप, दिलीप चव्हाण, संतोष साळुंखे, रामचंद्र जगताप, बाळासाहेब पोपटराव जगताप, विलास जगताप, शेणोली सोसायटीचे अध्यक्ष सचिन कणसे, माजी अध्यक्ष सुनील शामराव कणसे, सुहास कणसे, माजी सरपंच अशोकराव कणसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अंकुश कणसे, सागर कणसे, अमेय वेदपाठक, व्यंकठराव पाटील, शंकर पाटील, शिवाजी यशवंत कणसे, प्रशांत कणसे, जयकर गायकवाड, दुशेरे सोसायटीचे अध्यक्ष राजाराम जाधव, माजी अध्यक्ष सुभाषराव जाधव, अनिल जाधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |