09:04pm | Apr 12, 2021 |
पुणे : बोपदेव घाटात दुचाकीवरील दांम्पत्यास दमदाटी करुन मोबाईल चोरणार्या टोळक्यास कोंढवा पोलिसांनी फलटण तालूक्यातून पकडले आहे. या संशयितांकडून दुचाकी चोरीचे सात व तीन दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच 10 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. यासाठी कोंढवा पोलिसांचे एक पथक फलटण तालूक्यातील एका गावात वेषांतर करुन काही दिवस राहिले होते.
ओमकार हिंदुराव शिरतोडे दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे तिघे (रा.मुंजवडी, ता.फलटण, जि.पुणे), दिपक वावा भंडलकर, ऋषीकेश प्रल्हाद बोडरे (दोघेही रा. खुंटे, ता. फलटण, जि. सातारा), अभिजित ऊर्फ आबा अंकुश जाधव (रा.चौधरवाडी, ता.फलटण जि.सातारा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 एप्रिल रोजी रात्री 11 वा. सुमारास बोपदेव घाटातुन मोटर सायकल वरुन फिर्यादी बाळासाहेब सुभाष भिंताडे व त्यांची पत्नी वैजंती प्रवास करत पुण्याकडे येत होते. त्यांना दोन पल्सर मोटर सायकल वरुन आलेल्या 6 आरोपींनी अडवून, दमदाटी व धमकी देवुन फिर्यादी यांचा 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी चोरला. यानंतर आरोपी पल्सर मोटर सायकल वरुन सासवडच्या दिशेने निघुन गेले होते. या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन गोरे, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे व तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरू केला. पोलीस नाईक संजीव कळंबे यांना मिळालेल्या खबरीवरुन आरोपी हे फलटण तालुक्यातील असल्याबाबत त्यांना माहिती प्राप्त झाली.
कोंढवा तपास पथकातील पोलीस नाईक सुदाम वावरे व पोलीस आंमलदार ज्योतीबा पवार हे फलटणमधील संबंधित गावात वेषांतर करुन थांबले. यानंतर त्यांनी चोरट्यांची तसेच गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर मोटर सायकलबाबत माहिती प्राप्त केली. त्या माहितीच्या आधारे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस नाईक सुदाम वावरे, संजीव कळंचे, पोलीस अंमलदार ज्योतीबा पवार, किशोर वळे यांनी मु.पो. मुंजवडी व खुंटे (ता.फलटण, जि.सातारा) या गावात जावून आरोपींना ताब्यात घेवून अटक केली.
आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपींकडुन बोपदेव घाटात केलेल्या तीन दरोड्याच्या गुन्ह्यातील 4 मोबाईल, कोंढवा पोलीस ठाणे, दत्तवाडी पोलीस ठाणे, सासवड पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे व कराड पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हद्दीमध्ये पल्सर मोटर सायकल चोरीचे 7 गुन्हे त्यातील 7 पल्सर मोटर सायकली असे एकुण 10 गुन्हे उघड आले. या गुन्हयातील एकुण 10 लाख 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल व आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उप निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस अंमलदार निलेश वणवे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, जोतीबा पवार, किशोर वळेए लक्ष्मण होळकर, आदर्श चव्हाण, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |