सातारा : सातारा येथील जिल्हा कारागृहातील सहा कैद्यांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने ते कोरोनातून ठणठणीत बरे झाले असून आज दुपारी त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज संध्याकाळी उशिरा कोरोनाचे नवीन 31 रुग्ण निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 309 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
काल जिल्ह्यात एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे 77 रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. गेल्या दोन महिन्यातील उच्चांक कालच्या आकड्यामुळे प्रस्थापित झाला होता. आज सकाळी जिल्हा कारागृहातील 6 कैदी कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने जिल्हावासियांना सुखद धक्का बसला. असे असताना आज संध्याकाळी पुन्हा कोरोनाचे 31 बाधित रुग्ण सापडले आहेत.
कराड तालुक्यातील म्हासोली येथील निकट सहवासीत 30, 50 व 55 वर्षीय महिला, वर्षीय महिला, 65 व 25 वर्षीय पुरुष 9 वर्षाचे बालक. शमगाव येथील निकट सहवासीत 42 वर्षीय पुरुष. इंदोली येथील निकट सहवासीत 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण, 14 वर्षीय तरुणी व 12 वर्षाची मुलगी असे एकूण 11. पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला व 2 वर्षाचे बालक असे एकूण 3. सातारा तालुक्यातील कारी येथील 24 वर्षीय तरुण 57 वर्षीय पुरुष. चाळकेवाडी येथील मुंबई येथून आलेली 35 वर्षीय महिला. मुंबई येथून आलेला माळ्याचीवाडी (कन्हेर) ता. सातारा येथील 27 वर्षीय युवक असे एकूण 4. जावली तालुक्यातील केळघर येथील 12 वर्षीय बालक,53 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण व 52 वर्षीय महिला असे एकूण 4. वाई तालुक्यातील आसले येथील निकट सहवासीत 49 वर्षीय महिला. वासोळे येथील निकट सहवासीत 8 वर्षीय बालक व 43 वर्षीय महिला. आसरे येथील 70 वर्षीय सारीचा रुग्ण व मुंबई येथून आलेला 67 वर्षीय पुरुष असे एकूण 5. महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील निकट सहवासीत 85 व 40 वर्षीय महिला असे एकूण 2. खटाव तालुक्यातील निमसोड येथील मुंबई येथून आलेला 35 वर्षीय पुरुष एक. कोरेगांव तालुक्यातील वाघोली येथील निकट सहवासीत 56 वर्षीय महिला एक. असे एकूण 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 309 झाली असून यापैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 182 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेली रुग्णसंख्या 120 आहे तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 7 वर गेल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |