04:57pm | Sep 26, 2021 |
सातारा : सातारा जिल्हय़ात लसीकरणाने चांगलीच गती घेतली असली तरी ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. त्यापैकी अनेकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नव्हता. त्यासाठी सवयभान व स्वयंम सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने रिलायन्स फांऊडेशनकडून मोफत कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करुन 300 ते 350 नागरिकांना लसीचा दुसरा डोस साताऱ्यातील ऑन्को लाईफ केअरच्या सहकार्याने देण्यात आले.
सातारा शहरात पालिकेकडून देखील चांगल्या पध्दतीने लसीकरण सुरु आहे. कोव्हिशिल्ड लस मोठया प्रमाणावर येत असल्याने त्याचे डोस नागरिकांना मिळत आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतलीय त्यांना दुसरा डोस मिळण्यासाठी या संस्थांनी पुढाकार घेतला आणि साताऱ्यातील तामजाईनगर येथे असलेल्या ऑन्को लाईफ केअरच्या स्टाफच्या सहकार्याने मोफत कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिक व महिलांना देण्यात आला.
यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे मारुती खडके, सवयभान संस्थेचे सचिव मनोज देशमुख, आनंद कासट, ऍड. नितीन शिंगटे, सुयश लुणावत, स्वयंम सामाजिक संस्थेचे मनोज विधाते, पत्रकार चंद्रकांत देवरुखकर उपस्थित होते. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी नागरिकांची नोंद करुन त्यांना लस देण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, कोव्हक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी सवयभान, स्वयंम संस्थेसह रिलायन्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |