12:20pm | Aug 12, 2022 |
मुंबई : आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेनं आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीत मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्क सक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक
देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.44 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात 18 हजार 53 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. . देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे.
दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ
दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 2700 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे., गेल्या 24 तासांत 2726 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये यावर्षी 2 फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 14.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |