कोलकाता : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय डॉक्टर देतील. पुढच्या आठवड्यामध्ये गांगुलीला डिस्चार्ज मिळू शकतो, तसंच त्याची बायपास सर्जरी करण्याची बहुतेक गरज पडणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असं वूडलॅन्ड्स रुग्णायलाच्या सीईओ रुपाली बसू यांनी सांगितलं.
सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का लागला. यानंतर त्याला कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात सौरव गांगुलीची कोरोना टेस्ट करण्यात आली. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.48 वर्षांच्या सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सौरव गांगुलीला रुग्णालयाच्या क्रिटिकल केयर यूनिटमध्ये भरती करण्यात आलं आहे.ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना सौरव गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं, त्यामुळे त्याला कुटुंबाने रुग्णालयात नेलं. तिकडे गांगुलीची एन्जियोप्लास्टी करण्यात आली.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या हृदयातल्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले आहेत, यातल्या एका रक्तवाहिनीत तर 90 टक्के बॉल्क झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. पहिल्या एन्जियोप्लास्टीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. काल त्याच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंट टाकण्यात आलं. यानंतर आता पुढच्या काही दिवसात आणखी दोन स्टेंट टाकले जाऊ शकतात.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |