08:54pm | Nov 06, 2020 |
प्रकाश राजेघाटगे
बुध : खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय वनवा पेटू लागला आहे. पॅनल प्रमुखांकडून गावस्तरावर उमेदवार चाचणी सुरू केली आहे. हा राजकीय वनवा आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकापर्यंत चालू राहील असे वाटते. दरम्यान ऐन दिवाळी सणात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यताही जाणकार राजकारणी व्यक्त करीत आहेत.
सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपल्याने तेथे प्रशासकाची निवड करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ग्रामपचायत निवडणुका झाल्पा नाहीत. यामुळे प्रसाशकाच्या निवडी झाल्या आहेत. अन्यथा ऑगष्ट अखेरपर्यंत निवडणुका होणे आवश्यक होते. आता करोनाचा असर कमी झाल्याने, रूग्ण संख्या कमी झाल्याने बरीच शासकीय कार्यालये, एसटी प्रवास, आठवडी बाजार, बाजारपेठ चालू करण्यास शिथीलता दिली आहे. दळणवळण, आंदोलने, माध्यमिक शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. यामुळे प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्याचा मार्गही जवळपास मोकळा झाला आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुका घेण्याच्या दृष्टीने कारवाई चालू असल्याचे दिसत आहे. यातच पुणे पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याप्रमाणे तालुक्यातील ९० ग्रामपंचायत वार्डच्या आरक्षण संदर्भाने प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. यामुळे कोणता वॉर्ड कोणत्या आरक्षणासाठी पडला, कोणत्या वॉर्डात कोणता समाज, कार्यकर्ता आहे. त्या अनुषंगाने पॅनल प्रमुखांकडून कोण उमेदवार दयायचा, कोण जवळ करायचा आदी विषय चर्चिले जात आहेत. अद्याप तरी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. हे जाहीर झाल्यानंतर काही काळातच अचानकपणे पंचवाषिक निवडनुकिचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो. ऐन दिवाळी सणात निवडणूक कार्यक्रम येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत बरोबर आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे . यामुळे ग्रामपंचायत निवडूकीनंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया काही काळानंतर होवू शकते. ग्रामपंचायत निवडणूका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी निवडणूक झाल्यानंतर पक्षांतर बदीप्रमाणे पॅनलमथूनही बाहेर पडण्यास आता नियम घातले आहेत. यातच भाजप सरकारच्या काळात सरपंचपद थेट जनतेतून तर सदस्य प्रभाग पध्दतीने निवडून आले होते. आता या सरकारने बदल करण्याचा पवित्रा घेतला असला तरी अंतिमवेळी कशाप्रकारे निवडणूक होते याकडे इच्छूक व मतदाराचे लक्ष लागले आहे.
निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीयदृष्ट्या जागृत असणार्या निमसोड, पुसेगांव, कलेढोण, अंबवडे, गुरसाळे, कातरखटाव, एनकुळ, पुसेसावळी, गोरेगांव, पारगांव, उंचीठाणे, मांडवे, तडवळे, वडगांव, नागाचे कुमठे, वरुड, पेडगांव, सातेवाडी, हिंगणे, उंबर्डे, चितळी, पाचवड, हिवरवाडी, कान्हरवाडी, बोंबाळे, डाळमोडी, धोंडेवाडी, गोपूज, नायकाचीवाडी, वडी, लांडेवाडी, नांदोशी, जायगांव, गणेशवाडी, येरळवाडी, बनपुरी, सुर्याचीवाडी, डांभेवाडी, दातेवाडी, खातगुण, दरुज, कोकराळे, भोसरे, अंभेरी, लोणी, नढवळ, मुळीकवाडी, निढळ, चोराडे, कणसेवाडी, मानेवाडी-तुपेवाडी, गुंडेवाडी, पिंपरी, ढोकळवाडी, कानकात्रे, गारळेवाडी, तरसवाडी,अनफळे, गारुडी, विखळे, रहाटणी, वांझोळी, लाडेगांव, शेनवडी, पुनवडी, रेवली, कळंबी, खबालवाडी, खरशिंगे, येळीव, वाकेश्वर, कारंडेवाडी, धारपुडी, जांब, गादेवाडी, जाखणगांव, गारवडी, भुरकवडी, चिंचणी, मांजरवाडी, मोळ, वेटणे, रणसिंगवाडी, राजापूर आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वरील ग्रामपंचायतींच्या निवडणूकी संदर्भात कच्या, पक्या याद्या तयार करण्यासंदर्भात तलाठी व निवडणूक शाखेत हालचाली सुरु आहेत. तर अतिशय जागृत असलेल्या काही गावात किरकोळ बैठका, चर्चा, विचार-विनीमय सुरु आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेस गती येणार असल्याची चर्चा आहे.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |