सातारा : जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर व परिसरात दहा जणांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन व संचारबंदी जारी केली असतानाही दि. 11 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पोवई नाका येथे संजय पांडुरंग लोंढे (वय 70) रा.प्रतापगंज पेठ, सातारा, बाबासाहेब पांडुरंग घोरपडे (वय 57) रा. खोजेवाडी, ता. सातारा हे विनाकारण सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी चालवताना आढळून आल्याची तक्रार पोलीस शिपाई स्नेहल प्रकाश शिंदे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर वरील दोघांवर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत. दरम्यान, 9.15 पडण्याच्या सुमारास गणपत गवराई पडगर ( वय 30) रा. कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा. असिफ नूर मोहम्मद सय्यद (वय 32) रा. पिरवाडी, ता. सातारा हे दोघे विनाकारण पोवई नाका येथे रस्त्यावर दुचाकी चालवताना आढळून आल्याची तक्रार पोलीस शिपाई प्रमोद सोनवणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. वरील दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 11 रोजी 8.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील कमानी हौद परिसरात मयूर अंबादास वाघमारे (वय 19) रा. शुक्रवार पेठ, सातारा, दीपक कुमार निसार (वय 19) रा. सांगलीवाडी, जि. सांगली, विनोद अशोक माने (वय 20) रा. धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा, स्नेहल बबन भोसले (वय 23) रा. श्रीधर कॉलनी, शाहूनगर, गोडोली, ता. सातारा हे विनाकारण रस्त्यावर दुचाकीवर फिरताना आढळून आल्याची तक्रार पोलीस हवलदार बळीराम सणस यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच परिसरात पार्थ प्रशांत गिते (वय 25) रा .रविवार पेठ, सातारा, चंदन काशिनाथ पवार हे दोघे विनाकारण रस्त्यावरून दुचाकी घेऊन फिरताना आढळून आ्ले. त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |