बुध: ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. मतदार राजापर्यंत पोहचण्यासाठी अनेक मार्गाचा वापर केला जात आहे. बॅनर, जाहिराती, जाहीरनामे, प्रत्यक्ष गाठीभेटी याबरोबरच आता वासूदेवाचा निवडणूक प्रचारात प्रवेश झाला आहे.
वासुदेव हा ग्रामीण जिवनाचा महत्वपूर्ण भाग. पूर्वी सकाळी सकाळी वासुदेव देवाची गाणी म्हणत संपूर्ण गावाला जागे करायचा. सकाळ व्हायची तीच मुळी वासुदेवाच्या गाण्याने. पण आता वासुदेव गावात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू या वासुदेवाच्या कलेचा निवडणूकीसाठी वापर होताना दिसत आहे. बुध (ता.खटाव) येथील सचिन महाजन व त्यांच्या टीमने वासुदेवाच्या कलेची संकल्पना उचलली आणि त्यांच्या टीमसहित ही कलाकार मंडळी निवडणूकीमध्ये गाण्याच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करतांना दिसत आहेत. त्यामुळे या अनोख्या प्रचारशैलीनेे लोकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.
सोशल मीडियावरही जोरदार प्रचार होत आहे. प्रत्येक उमेदवार आपला निवडणूक प्रचाराचा व्हिडिओ बनवुन मतदार राजाला पाठवत आहे. तसेच महिला मंडळीही घरोघरी जाऊन महिलांना हळदी कुंकू लावून प्रचार करत आहेत. वैयक्तिक गाठीभेटीला जोर आलेला आहे. निवडणूकीच्या प्रचाराने वातावरण भारावून गेलेले आहे. चौकाचौकात गप्पाचे फड रंगले आहेत. सर्वत्र निवडणूकीचीच चर्चा होताना दिसत आहे. आपण केलेल्या मेहनतीचे फळ पाहण्यासाठी मात्र व मतदार राजाचा कौल कुणाला मिळेल हे पाहण्यासाठी निवडणूक निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |