वाई : महाराष्ट्रभरातील वाचनप्रेमी शिक्षक व लेखकांसाठी सुरु करण्यात आलेल्या वाचन साखळी समुहामध्ये केवळ चार महिन्यात 100 पुस्तकांचा परिचय उत्कृष्टपणे करुन दिल्याबद्दल लेखक रविंद्रकुमार लटिंगे यांचा महाराराष्ट्र राज्य वाचन साखळी समुहातर्फे वाचनयात्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वाई येथील देवगिरी हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात वाचनसाखळी समुहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविंद्रकुमार लटिंगे यांनी या वाचन साखळी समुहावर केवळ चार महिन्यांमध्ये 100 पुस्तकांचे अतिशय उत्कृष्टरित्या पुस्तक परिचय केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. हा वाचन साखळी समूह जवळपास 7500 सदस्यांचा असून यामध्ये लटिंगे वाचनयात्री पुरस्काराचे ते दुसरे मानकरी ठरले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे, लेखिका व कवयित्री सौ.अंजलीताई गोडसे, वाचनयात्री पुरस्काराचे प्रथम मानकरी व लेखक गणेश तांबे, आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक लक्ष्मण जगताप, आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक भुजबळ, विचारवेधचे लेखक राजेंद्र बोबडे, उपक्रमशील शिक्षक प्रकाश बडदरे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुखा विजया कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला मर्ढेकर, दिलीप कासुर्डे, नंदकुमार डोईफोडे, विजयराव शिवथरे, शेखर जाधव, शिवाजी निकम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य हा समूह वाचन संस्कृतीला जोपासणारा व वाढवणारा समूह असून अत्यंत कमी कालावधीमध्ये या वाचनसाखळी समूहाने अत्यंत गरुडझेप घेतलेली आपणास दिसून येते. यावेळी राजेंद्र बोबडे, शकुंतला मर्ढेकर, अंजली गोडसे, दीपक भुजबळ, लक्ष्मण जगताप, गणेश तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रतिभाताई लोखंडे यांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचन साखळी समूहाची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांची माहिती विषद केली. 'वाचन यात्री'सन्मान सोहळ्याचे आयोजन व संयोजक अप्रतिम केलेबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.वाचन संस्कृती संवर्धनासाठी साहित्यिकांचे विचार आत्मसात करुन जीवनात सकारात्मक संस्काराची पेरण करुया, असे विचार व्यक्त केले.
रविंद्र लटींगे यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये "हिरवी पाती" व "पाऊले चालती" ही दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. अत्यंत कुशल व शब्द भंडाराची जादुई किमया असणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व त्यांच्या या पुरस्काराबद्दल अनेक विभागातून त्यांचे अभिनंदन होत आहे. स्वागत प्रेमा लटिंगे, राहूल हावरे, शिवाजी फरांदे यांनी केले. प्रास्ताविक उध्दव निकम, सन्मापत्राचे वाचन सारिका लटिंगे यांनी केले. आभार सुनील जाधव यांनी मानले, तर सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. कार्यक्रमास वाचन साखळी समूहाचे सदस्य व सदस्या उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |