पुसेगाव: आजपर्यंत राजकारणात पक्षाने मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. मला हे केवळ जनतेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. याचा मला कधी विसर पडलेला नाही. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
कटगुण (ता.खटाव) येथील आमदार शशिकांत शिंदे व प्रदीप विधाते यांच्या फंडातून श्री चिलाई देवी मंदिराच्या सभा मंडपासाठी 10 लाख व मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या कामासाठी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच जयश्री कदम, उपसरपंच जयदीप गायकवाड, पंचायत समिती उपसभापती संतोष साळुंखे, रमेश शिंदे, माजी सरपंच उदय कदम, बाळासाहेब अभंग, महेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री विधाते पुढे म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे व पक्षातील वरीष्ठांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास मी नेहमी सार्थकी लावत आलो आहे. आजपर्यंत सर्वसामान्यांच्या, शेतकर्यांच्या समस्या सोडवितांना पक्षाने मला ताकद दिली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बराचसा निधीचा उपयोग विकास कामांकडे वळवता आला नाही. तरीही जनतेच्या जास्तीत जास्त समस्या मार्गी कशा लागतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संदर्भात बोलताना श्री.विधाते म्हणाले, येणारे पंधरा दिवस कुटुंबासाठी, गावासाठी व तालुक्यासाठी खुप महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा व गावोगावच्या युवकांनी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी समुहाने गोळा होणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |