08:57pm | Dec 01, 2021 |
कराड : राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थामधुन विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा निलम येडगे व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मलकापूर पालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेविका अलका जगदाळे, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, धनराज शिंदे उपस्थित होते. ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांचा मलकापूर नगरपालिकेच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. नगरपंचायतीची नगरपरिषद करण्यासाठी विधान सभेमध्ये प्रश्न मांडून नगरपालिका स्थापनेपासुन सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राच्या माध्यमातुन त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. याबरोबरच मलकापूर शहराच्या सर्वांगिण विकासामध्येही ना. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये मलकापूर नगरपालीएक्ची सांडपाणी प्रक्रिया योजना, मलकापूर शहराचा विकास आराखडा, नगरपालिकेची अद्यावत प्रशासकीय इमारत आदी. कामांमध्येही ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नेहमीच मलकापूर नगरपालिकेला प्राधान्य दिलेले आहे. तसेच वेळोवेळी नगरपालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित राहून पालिकेच्या कारभाराविषयी दिलेल्या सुचना महत्वपुर्ण ठरलेल्या आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीमुळे नेहमीच नगरपालिकेच्या विकासकामांना गती मिळालेली आहे. तसेच प्रधनमंत्री आवास योजना प्रकल्पासही त्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांचा माजी आ. स्वा.सै.कै. भास्करराव शिंदे यांच्या पश्चात मलकापूर शहरवासिंयाना जिव्हाळा निर्माण झाला आहे. मा. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरीने मलकापूरच्या विकासासाठी नेहमीच ते प्रयत्नशील राहुन मलकापूर नगरपलिएक्च्य विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवाय, अडी-अडचणीच्या काळात त्यांनी केलेला संघर्ष व त्यांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे. त्यांचा जनसंपर्क विचारात घेऊन त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडूण देण्यात आले आहे. यावरुन त्यांनी आजवर त्यांच्या राजकिय कारकिर्दीत केलेल्या कामाची हीच पोहोचपावती आहे.
त्यांच्या या निवडीमुळे भविष्यामध्ये मलकापूर नगरपालिकेच्या विकास कामासाठी गती मिळणार आहे. ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांचा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मलकापूर शहरवासियांच्या उपस्थितीमध्ये लवकरच सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असुन त्यांना मलकापूर नगरपालिका व शहरवासीयांच्या वतीने पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |