12:37pm | Jun 29, 2020 |
नवी दिल्ली: मोटार अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणार्या नुकसान भरपाईबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्वपूर्ण निकाल दिला. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विद्यमान कमाईत भविष्यातील संभाव्य संपूर्ण कमाई जोडूनच नुकसान भरपाई दिली जावी असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या उत्तराखंडातील पीडित कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सु्प्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने हा निर्णय दिला.
मोटार अपघात मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाई बाबत निर्णय देताना नुकसानभरपाईच्या रकमते सुप्रीम कोर्टाने वाढ केली आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या वाहनाची विमा कंपनीनी ही वाढलेली 17 लाख 50 हजार रुपये इतक्या नुकसान भरपाईची रक्कम द्यावी. या बरोबर या रकमेवर साडे सात टक्के व्याजही दिले जावे, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विशेषाधिकाराचा प्रयोग करत नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पीडितांना संपूर्ण न्याय मिळणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
उत्तराखंड हायकोर्टाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या शेवटी भरलेल्या आयकर परताव्याचा विचार न करून चूक केली आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीने हा परतावा मृत्युपूर्वी दाखल केला होता. यात त्याने आपली मिळकत वार्षिक 1 लाख रूपये असल्याचे सांगितले आहे. हायकोर्टाने त्यापूर्वीच्या तीन मिळकत पराव्याचा सरासरी 52635 रुपये इतकी वार्षिक मिळकत असल्याचे मानले. ही हायकोर्टाची चूक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर कनिष्ठ न्यायालयाने आयकर परतावा 2006-07 ची मिळकत 98500 असल्याचे मान्य केले होते. मात्र त्यात भविष्यातील मिळकत जोडली नव्हती.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव हरीश असे असून त्याने सन 2006-07 मध्ये दाखल केलेल्या आयकर परताव्यात आपली वार्षिक मिळकत 1 लाख रुपये असल्याचे म्हटले होते. हा परतावा त्याने मृत्युपूर्वी दाखल केला होता. हा परतावा त्याने 20 एप्रिल 2007 या दिवशी दाखल केला होता. तर हरीशचा मृत्यू 18 जून 2007 ला झाला होता. त्यावेळी त्याचे वय 35 वर्षे इतके होते. हरीशवर त्यांची पत्नी, मुले आणि आई-वडील अवलंबून होते. खालच्या न्यायालयाने एक लाख रुपये वार्षिक मिळकतीच्या हिशेबाने एकूण नुकसान भरपाई 12 लाख 55 हजार इतके ठरवले. मात्र यात हरीश यांच्या भविष्यकालीन मिळकतीचा उल्लेख केलेला नव्हता.
हा अपघात उत्तराखंडमधील बनबना येथे 18 जून 2007 या दिवशी झाला होता. यात हरीश यांचा मृत्यू झाला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |