सातारा : खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी आदी गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यातील चार टोळीतील १८ जणांना तडीपार केल्याचा आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी आज पारित केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, दरोडा, दुखापत करणे व मालमत्ता विरुद्ध गुन्हे दाखल असणाऱ्या टोळीचा प्रमुख आमिर इमतियाज मुजावर (वय २२) रा, पिरवाडी, ता. सातारा, अमीर सलीम शेख (वय १९) रा. वनवासवाडी, ता. सातारा, अभिजीत उर्फ आबू राजू भिसे (वय १८) रा. आदर्श नगरी शेजारी, सैदापूर, ता. सातारा, सौरभ उर्फ गोट्या संजय जाधव (वय २०) रा. सैदापूर, ता. सातारा, जगदीश रामेश्वर मते (वय २०) रा. रांगोळी कॉलनी, शाहूपुरी, सातारा, आकाश हणमंत पवार (वय २०) रा. सैदापूर, ता. सातारा यांची टोळी तयार झाली होती. ते टोळीने गुन्हे करीत होते. त्यामुळे या टोळीतील सहा जणांना हद्दपार करण्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याने प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे सादर केला होता. वरील सहा जणांना सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षाच्या कालावधी करता हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, मारामारी करणाऱ्या टोळीचा प्रमुख सागर नागराज गोसावी (वय २३) रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा, विपुल तानाजी नलवडे (वय २०) रा जाधवचाळीच्या पाठीमागे, सैदापूर, ता. सातारा, अर्जुन नागराज गोसावी (वय ३५) रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. सातारा, रवी निलकंठ घाडगे (वय २५) रा. यशवंत नगर, सैदापूर, ता. सातारा या टोळीतील पाच जणांना हद्दपार करण्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने प्रस्ताव सादर केला होता. त्यांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधी करता हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गर्दी, मारामारी, दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरांना मारामारी करून गंभीर दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करणे आदी गुन्हे करीत असलेल्या टोळीतील रॉकी निवास घाडगे (वय २९), कृष्णा निवास घाडगे (वय २३), सनी निवास घाडगे (वय ३०) सर्व रा. लाखानगर, सोनगिरवाडी, ता वय या टोळीतील तीन जणांना हद्दपार करण्याबाबत वाई पोलीस ठाण्याच्यावतीने प्रस्ताव सादर केला होता. त्यांनाही सातारा जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधी करता हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. तसेच कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न,गर्दीमारामारी, दुखापत करणे, असे शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करीत असलेल्या टोळीचा प्रमुख १) आशिष अशोक पाडळकर, वय-३२ वर्षे रा.मलकापूर,ता.कराड, जि.सातारा.२) इंद्रजित हणमंत पवार, वय -२४ वर्षे (टोळी सदस्य)रा.मलकापूर,ता.कराड,जि.सातारा.३) अनिकेत रमेश शेलार, वय-२१ वर्षे, रा.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा. ४) सुदर्शन हणमंत चोरगे, वय- २० वर्षे, रा.कोयना वसाहत कराड, ता.कराड, जि.सातारा. या टोळीतील चार इसमांना हद्दपार करणे बाबत कराड शहर पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे त्यांचे कडुन सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये यासाठी त्यांना अजय कुमार बंसल, प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा व लगतच्या सांगली जिल्हयातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतुन ०२ वर्षे (दोन वर्षे) कालावधी करीता हद्दपारीचा आदेश केला आहे.
वरील चारही टोळीतील १८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे संशयीत हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यामुळे सवसामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शाररीक नुकसान झाले आहे. हद्दपार यांना कायदयाचा धाक नसुन ते बेकायदेशिर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती.त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. म्हणुन त्यांना अजय कुमार बंसल, प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये १८ इसमांचेवर वरील प्रमाणे आदेश केलेले आहेत.आदेशाची बजावणी झाल्यानंतर ४८ तासाचे आंत त्यांना हद्दपार केले क्षेत्रा बाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक, धिरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, स.पो.नि.विजय गोडसे व कराड शहर पोलीस ठाणेचा डी.बी.स्टाफ, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, शाहुपुरी पोलीस ठाणेचे स.पो.नि. व्ही.के.वायकर, वाई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्वस्थरातुन समाधान व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडांचे विरुध्द कारवाई करणेत येणार आहे. या नवीन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गुन्हेगारांना हद्दपार करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |