10:32pm | Jun 16, 2021 |
सातारा : जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अंशतः लॉक डाउनमुळे अनेकांची फरफट होत असून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली असताना सातारा जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशनने पुढाकार घेत करंजे, ता. सातारा येथे ७२ गोर- गरीब गरजूंना किराणा मालाच्या किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.
मार्च २०२२ मध्ये सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवून दिल्यामुळे प्रशासनाने अनेक उपाय योजना हाती घेतल्या. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यामध्ये अंशतः लॉकडाउन आणि शनिवार आणि रविवारी विकली ऍड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. गेले पंधरा महिने कोरोनाचा लपंडाव सुरू असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहीजणांचे उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आज सकाळी सातारा जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशनने पुढाकार घेत करंजे, ता. सातारा येथील भोसले मंडप डेकोरेटर्स यांच्या गोडाऊनमध्ये परिसरातील सुमारे ७२ गोरगरीब, गरजू नागरिकांना साबण, टूथपेस्ट, तांदूळ, ज्वारी, गहू, मीठ, चटणी, मुगडाळ, तुरडाळ, चहापावडर याचा समावेश असणाऱ्या किराणा मालाच्या किटचे वाटप केले.
यावेळी ज्येष्ठ मंडप व्यावसायिक वसंतरावकाका भोसले, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ हादगे सचिव रमेश साळुंखे, खजिनदार राजुशेठ भोसले, कार्यकारणी सदस्य अमित पवार, तालुकाध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष संतोष साळुंके, सचिव हरिभाऊ साळुंखे, खजिनदार रुपेश टिळे, तालुका सदस्य दादा भिलारे, सुरेशबापू हादगे, संतोष अण्णा शिंदे, पिंटू देशमाने, संजय धुमाळ आदी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |