सातारा : सातारा येथील सदरबझार परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने (सर्व रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, मधूरा मनोज माने (वय ४१, रा. देवी कॉलनी, सदरबझार, सातारा. मूळ रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) या अकौंटंट असून त्यांचा विवाह मनोज मधुकर माने यांच्याशी झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २00८ ते १६ सप्टेंबर २0२१ या कालावधीत मधुरा यांना पती मनोज मधूकर माने याने शारीरिक, मानसिक त्रास देत दारुच्या नशेत मुलींना शिवीगाळ, मारहाण केली तसेच लग्नात घातलेले मंगळसूत्र घेवून कर्ज फेडण्यासाठी ते गहाण ठेवले होते. दरम्यान, पती मनोज हा मधुरा यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना सतत मारहाण करत होते. सासू प्रभावती मधूकर माने ही मधूरा यांना उपाशीपोटी ठेवत होत्या तर सासरा मधूकर भिकाजी माने आणि दिर शैलेश मधूकर माने हे सतत टोचून बोलत होते. मधूरा यांना या चौघांकडून मुंबई, पुणे आणि गोडोली येथे त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यास कंटाळून मधूरा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. १0 रोजी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने या चौघांवर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |