12:43pm | Jul 05, 2020 |
फलटण : दुधेबावी (ता. फलटण) येथील दोन सख्ख्या भावांमध्ये जमीन वाटपाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे गावासह तालुक्यात खळबळ उडाली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानदेव महादेव सोनवलकर (रा. दुधेबावी, ता. फलटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ हणमंत महादेव सोनवलकर, सुनीता हणमंत सोनवलकर, पुतणे अनिकेत हणमंत सोनवलकर व शंभूराज हणमंत सोनवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे दुधेबावीसह परिसर हादरला आहे.
ज्ञानदेव सोनवलकर हे सकाळी घरासमोर बसले असताना भाऊ हणमंत, पुतणे अनिकेत आणि शंभूराज व सुनीता हे सर्व त्यांच्या घरासमोर आले. यावेळी हणमंत याने तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणत ज्ञानदेव यांना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. याचवेळी शंभूराज याने हातातील लोखंडी गजाने ज्ञानदेव यांच्या डोक्यात वार केला. अनिकेत याने कुर्हाडीने त्यांच्या पायावर वार केले. याचबरोबर सुनीता व हणमंत यांनीही लोखंडी पाईपने मारहाण केली.
यानंतर शेजारी असणार्या लोकांनी यामध्ये मध्यस्थी करून भांडणे सोडवली. परंतु, या मारहाणीत ज्ञानदेव सोनवलकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना प्रथम खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान सोनवलकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानदेव सोनवलकर यांच्या पत्नी अनिता सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत यातील हणमंत सोनवलकर व शंभूराज सोनवलकर या बाप-लेकाला अटक केली आहे. तर आई आणि मुलगा दोघे पसार आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |