12:21pm | Apr 01, 2021 |
पॅरिस: संपूर्ण जगभरच कोरोना संकटाची तीव्रता वाढत चालली आहे. अनेक देशांत सध्या चिंताजनक परिस्थिती आहे. एकीकडे अर्थव्यवस्था सावरण्याची कसरत असून असतानाच दुसरीकडे फान्समध्ये कोरोनाच्या तिसर्या लाटेने कहर माजवला असल्याने फान्समध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रॉयटर्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नुकतीच तिसर्या लॉकडाऊनची केली आहे. यामुळे फान्समधील शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील. रुग्णालयांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता व्यक्त करत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी लाटेला परतवून लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी देशातील निर्बंध मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र एक लाख मृत्यू झाले असून आयसीयूंची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आणि योजनेपेक्षा कमी वेगाने सुरु असलेलं लसीकरण यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना माघार घ्यावी लागली आहे.
जर आपण आता हालचाल केली नाही तर नियंत्रण गमावू, अशी भीती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली. फ्रान्समध्ये महिन्याभरासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला असून शनिवारपासून अमलबजावणी होणार आहे. महामारीचा शिक्षणाला फटका न बसू देण्याची ग्वाही देणार्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शाळादेखील तीन आठवड्यांसाठी बंद असतील असं स्पष्ट केलं आहे.
वर्षाच्या सुरुवातीपासून इमॅन्युअल मॅक्रॉन हे तिसर्या लॉकडाउन टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. पण करोनाच्या नव्या प्रकारामुळे फ्रान्सला फटका बसला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |