09:36pm | Oct 27, 2022 |
कोरेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व आले पिकाच्या व्यापारासाठी अग्रगण्य बाजारपेठ म्हणून खेड नांदगिरी गावची ओळख. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सर्वच राजकीय नेतेमंडळीसह ग्रामस्थांनी पक्ष विरहित एकत्र येऊन केला. अन् म्हणतो ना 'गाव करी ते राव काय करी' तसचं घडलं. सकाळी मंदिराचा जीर्णोद्धारासाठी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत तब्बल एक कोटी ३७ लाख २४० रुपयांची देणगी जमा झाली. ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे.
गावातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि शाळेसाठी खोल्या बांधण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी नजिकच्या काळात होऊ घातलेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यादृष्टीने पहिली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यातच भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणावर झाली होती. त्यामध्ये सर्वांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची शपथ ग्रहण केली होती.
बुधवारी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. खेड नांदगिरी, बर्गेवाडी, गणेश स्थळ व चंचळी येथील ग्रामस्थ व भाविक भक्तांची बैठक झाली. त्यामध्ये श्री भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धाराचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला. सुमारे सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून देणगी संकलनास सुरुवात होत असल्याचे जाहीर करण्यात आले. बघता बघता एक कोटी ३७ लाख २४० रुपयांची देणगी जमा देखील झाली. नजीकच्या काळात ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणखी देणगी जमा होणार असून लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम सुरू केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |