06:10pm | Oct 25, 2021 |
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन २ हजार ८०७ प्रमाणे उर्वरीत २७७ रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
कारखान्याचा नुकताच बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी, यशराज देसाई यांनी ही माहिती जाहिर केली. कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या सर्व १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ चे गळीत हंगामात २ लाख ३३ हजार ३२६ मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन ११.९१ % सरासरी साखर उताऱ्यांने २ लाख ७८ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे २०२०-२१ चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन २ हजार ८०७ रुपये इतकी आहे. एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची प्र.मे.टन रक्कम रुपये २ हजार ५३० रुपये प्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच ऊस पुरवठादारांना अदा केली असून उर्वरित एफआरपीची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात आली आहे.
कोविड महामारीतून उद्योगधंदे सावरत असताना बाजारपेठांमधील खरेदी-विक्री पुर्वपदार येत असून वेळोवेळी साखर विक्री दरामध्ये झालेला बदल, कामगारांची देणी, वाहतूक खर्च, वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हानांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कमही सभासदांना अदा करण्यात यश आले असल्याचेही सदर प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तसेच २०२१-२२ चे गळीत हंगामाची आवश्यक ती सर्व पूर्व तयारी झालेली आहे. लवकरच गळीत हंगाम शुभारंभ झाल्यानंतर कारखान्याचे गळीत हंगामास पूर्ण क्षमतेने सुरुवात होईल. यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी सदर प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |